(Jejuri News) पुणे : राज्याचे कुलदैवत दैवत असलेल्या जेजुरी गडाच्या पुर्नविकासाठी राज्य सरकारने १०९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा आणि शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर पूर्वी सुमारे १५० दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या. त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या १५ दिवसांत याबाबतचा कार्यादेश निघण्याची शक्यता आहे.
मंदिराचे काम मुख्यत्वे दगडांत केलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेले दगड बदलण्यात येणार आहेत. तसेच सुस्थितीत असलेल्या दगडांना चमकदार करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी १५० दीपमाळा असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व दीपमाळा सध्या पुनर्स्थापित करता येणे शक्य नसले, तरी त्यातील अनेक दीपमाळा पुन्हा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन दगडांना बदलून चमकदार केले जाणार आहे. हे काम मुख्यत्वे चुन्यात केले जाणार आहे. जेजुरी गडावरील मंदिराच्या विकासाचे, तसेच संवर्धनाचे काम या टप्प्यात होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
जेजुरी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर..!
जेजुरी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर..!