सागर जगदाळे / भिगवण : रायपूर (छत्तीसगड) येथे 2 ते 6 जानेवारी 2024-25 दरम्यान सुरु असलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेमध्ये जगदीश भारत तोंडे याने 19 वर्ष मुले 60 kg या गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून भारत देशात तिसरा क्रमांक (ब्राँझ मेडल) पटकावला आहे.
त्याबद्दल त्याचे व क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव, सतीश बनसुडे यांचे एल जी बनसुडे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे, उपाध्यक्ष डॉ शितल शहा, सचिव नितीन बनसुडे सर, प्राचार्य वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वृंद यांनी व इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.