Jagannath Yatra: पुरी : भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेली जगन्नाथ पुरी येथील ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे. या रथयात्रेचे महाराष्ट्र कनेक्शन मोठे आहे. मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी खास संबंध आहे. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातून ऐतिहासिक रथयात्रा निघते. यामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढतात. या रथयात्रेचे महाराष्ट्राशी अनोखे संबंध आहेत….(Jagannath Yatra)
पुरी येथील ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे.
रघुजीराजे भोसले अर्थात भोसले राजघराण्याचे प्रथम वंशज यांनी १७५१ मध्ये मोगलांसाठी बंगाल आणि ओडिशा नियंत्रित करणाऱ्या तत्कालीन नवाब अलीवर्दी खानयाचा पराभव केला होता. खान याला पराभूत केल्यानंतर जेव्हा रघुजी राजे ओडिशाला पोहोचले, तेव्हा मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी पुरीच्या मंदिराची काय दुरवस्था केली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रघुजी राजे भोसले यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्याकाळी ४० लाख रुपये खर्च करत अन्नछत्र, भोज कक्ष, २२ पेक्षा जास्त धर्मशाळांचे निर्माण केले होते. एवढेच नाही तर मंदिराला हजारो एकर जमीन देऊन आर्थिकदृष्ट्या मंदिर स्वतःच्या पायावर उभे राहील, अशी व्यवस्था केली होती..(Jagannath Yatra)
दरम्यान, रघुजीराजे भोसले यांच्या संरक्षणात मुस्लिम आक्रमणामुळे ही यात्रा काही काळ बंद पडली होती. त्यानंतर जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. .(Jagannath Yatra)रघुजी राजेंनी दरवर्षीच्या यात्रेसाठी प्रति वर्ष २० हजार रुपये खर्चही देऊ केला होता. तेव्हापासूनच स्थानिक गरिबांना सातत्याने काम मिळावं, या उद्दिष्टाने प्रत्येक वर्षाच्या यात्रेसाठी नवीन रथ निर्माण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे बोलले जाते. जगन्नाथ पुरी मंदिराच्या समोर उभा असलेला अरुण स्तंभ, ज्याला अनेक लोक गरुड स्तंभही म्हणतात… तो स्तंभ मराठ्यांनीच स्थापन केला आहे. त्याकाळी हे अरुण स्तंभ मंदिर लुटण्याच्या उद्दिष्टाने येणाऱ्या हल्लेखोरांना इशारा देण्यासाठी होते. या पलीकडे पाऊल ठेवल्यास गाठ मराठ्यांची आहे, असा त्याचा त्याकाळचा अर्थ होता.
मोहन भोगची प्रथा पुरीमध्ये आजही सुरू आहे. ही प्रथा मराठ्यांनी सुरू केल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले राजांनीच पुढील काळात पुरीला देशातील इतर भागांशी जोडणारे महत्त्वाचे रस्ते बांधले. पुरी शहराकडे येणारे अनेक पूल बांधले आणि त्यामुळेच पुरीची जगन्नाथ यात्रा देशभरातील भाविकांना आकर्षित करू लागली. भोसले राजांनीच जगन्नाथ पुरीसह ओडिशाच्या मोठ्या भागात प्रशासनिक व्यवस्था निर्माण केली. अनेक धर्मशाळा विहीर बांधल्या. शेतीची सुधारणा करत कर रचना निर्माण केली जमिनीचे रेकॉर्ड तयार केले..(Jagannath Yatra)