हिंगोली : हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोळेगावमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून तरुणीने थेट घर गाठत घरचाच ताबा घेतला. या प्रकरणी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोळेगाव या गावात हा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणीने थेट प्रियकर तरुणाचे घर गाठले. सरळ घरात घुसून या तरुणीने घराचा ताबा घेतला आहे. इतकेच नाही तर मुलाच्या आई-वडिलांना तुमच्या मुलावर माझं प्रेम आहे. त्यामुळे तुमच्या घरातून मी बाहेर जाणारच नाही; असे म्हणत तब्बल ४८ तास ही तरुणी घरात बसून राहिली. या प्रकारामुळे तरुणाच्या कुटुंबीयांची चांगलीच पंचायत झाली आहे.
तरुणी विरोधात गुन्हा..
दरम्यान सदर तरुणी घरातून जात नसल्याच्या प्रकारानंतर तरुणाचे वडील प्रकाश थिटे यांनी औंढा पोलीस स्थानकात जात घराचा ताबा घेणाऱ्या तरुणीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने ऐकावे ते नवलच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.