मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी चक्क सफाई कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील ही घटना आहे. या गंभीर घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचारी रुग्णाचे ईसीजी करत आहेत. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला आहे. शताब्दी रुग्णालयात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र पण या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. त्यावरच उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याबाबत जाब विचारला. पण डॉक्टर आणि कर्मचारी यांची कमतरता आहे आणि या सफाई कर्मचाऱ्यांना याच प्रशिक्षण दिलं आहे आणि ते गेले काही दिवस हे काम करत असल्याचे सांगण्यात आले.
या घड्लेल्या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील दोषीवर कारवाही करण्याची मागणी रुकसाना सिद्दिकी यांच्याकडून करण्यात आली आहे. तर यावर पोलिसात तक्रार दाखल करून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.