Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वालचंदनगर जंक्शन रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; विलंबाबाबत कंपनीवर दिशाभूल केल्याचा आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 10:16

आदित्य बोराटे –

पुणे : वालचंदनगर जंक्शन रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे यांनी रस्त्याच्या कामातील विलंबाबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रस्त्याची दुरवस्था, धूळ आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काटे यांच्या माहितीनुसार, या रस्त्याच्या प्रश्नावर २७ डिसेंबर २०२५ रोजी कळंब येथील बळीराजा सांस्कृतिक भवनात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शासन आणि संबंधित कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी ५ जानेवारी २०२६ रोजी वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत कंपनीने रस्त्याच्या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याचे सांगितले गेले.

 

मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत माहिती घेतल्यानंतर संबंधित कंपनीने मोबदल्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मिळाल्याचा दावा काटे यांनी केला आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने काम सुरू करण्यास अडचणी असल्याचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून सांगितले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, या विषयावर मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकही झाल्याचे काटे यांनी सांगितले. त्या बैठकीनंतर काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, कंपनीने मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय काम सुरू करण्यास नकार दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रस्त्याची दुरवस्था आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ आपण खड्ड्यात उतरून आंदोलन केल्याचे काटे यांनी सांगितले. संबंधित कंपनीने येत्या १५ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांचा तीव्र रोष ओढवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि दाव्यांबाबत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा संबंधित शासकीय यंत्रणेची अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही. रस्त्याचे काम लवकर सुरू होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता 2027 पर्यंत ऑफलाइन OMR पद्धतीनेच होणार परीक्षा

Thursday, 23 July 2026, 9:08

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

Thursday, 23 July 2026, 8:49

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Thursday, 23 July 2026, 8:38

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56
Next Post

साताऱ्यात धक्कादायक घटना: 8 वर्षांच्या चिमुरडीसोबत नातेवाईक महिलेचे अश्लील चाळे, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.