आपल्या निसर्गातील अनेक अशा गोष्टी आहेत त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. पालेभाज्या असो वा इतर वनस्पती त्याचे विशेष फायदे पाहिला मिळतात. त्यात आरोग्यासाठी मध हे गुणकारी मानले जाते. पण याच मधाची किंमतही जास्त असते. त्यामुळे अनेकदा भेसळयुक्त मध मिळण्याचा जास्त धोका असतो. मात्र, अशा काही पद्धती आहेत त्यातून आपण घेतलेले मध हे शुद्ध आहे की भेसळयुक्त याची माहिती मिळू शकेल.
मधाची घनता जास्त असते. म्हणजेच काय तर मध पाण्यासारखे काहीही ओले करू शकत नाही. मधात भेसळ आहे की नाही हे घरगुती माध्यमातून ओळखता येऊ शकते. यासाठी एक कागद घ्या आणि त्यावर मधाचे काही थेंब टाका. मधामुळे कागद ओला होऊ लागला तर मध बनावट किंवा भेसळयुक्त असल्याचे समजून घ्यावे. शुद्ध मध कागदाला ओला न करता चिकटतो. याशिवाय, आपल्या अंगठ्यावर मधाचा एक थेंब ठेवा. मधाचा थेंब बोटाला चिकटला तर समजून घ्या की मध शुद्ध आहे, पण जर बोटातून सहज मध निघाले तर समजा की मध बनावट आहे.
मध भेसळयुक्त आहे की शुद्ध हे पाण्याच्या माध्यमातूनही समजू शकते. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. नंतर एक मिनिट थांबा. मध पाण्यात मिसळण्याऐवजी स्थिर झाल्यास मध शुद्ध होईल. पण जर मध पाण्यावर तरंगले किंवा पाण्यात मिसळले तर ते भेसळयुक्त असू शकते.