सोलापूर : सोलापूरतील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने यांना अटकही झाली आहे. आता त्यांच्या आत्महत्येमागच कारण गृहकलहच असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगा डॉक्टर अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीत मनीषा माने यांच्या ईमेल बद्दल अर्धवट माहिती दिली आहे. वास्तव त्या मेलमध्ये मनीषा यांनी वळसंगकर कुटुंबातील गृहकलावर बोट ठेवल्याचे समोर आले आहे.
या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे यांनी केवळ एक दिवसाच्या पगारीच्या विषयावर तब्बल तीन पानांचा मेल मृत डॉक्टरांसह मुलगा आणि सुनेलाही पाठवला आहे.त्यात प्रामुख्याने गृहकलहावर लिहले आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या संशयाची सुई आता कुटुंबाकडे दिसून येत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांची सून शोनल वळसंगकर यांची देखील चौकशी केली होती. त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे नेमके कोण जबाबदार आहे.याकडे लक्ष लागल असताना मनीषा यांनी पाठवलेल्या त्या मेलमध्ये वास्तवात कुटुंबातील गृहकलावर बोट ठेवल्याची बाब पुढे येत आहे.
शिवाय ई-मेल लिहीत मनिषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली अशी होती अशी माहीती उघड झाली आहे..शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्स बद्दलदेखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केले होते अशीही माहिती उघड झाली आहे.