बापू मुळीक / सासवड : आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार पुरंदर तालुक्यातील राजुरी गावच्या विद्यमान सरपंच इर्षा प्रसाद भगत यांना प्रदान करण्यात आला आहे. ग्राम पातळीवर व सामाजिक क्षेत्रात केलेली कामे आणि शासनाच्या माध्यमातून गावात केलेली कामे मार्गी लावण्याचे काम त्या करत आहेत. याची दखल घेऊन इर्षा भगत यांना अविष्कार फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
याप्रसंगी आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुवर्णपदक विजेते केनेथ किर्तीजी, यशदाचे प्रशिक्षक विवेक गुरव, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नितीश कुमार भरगुडे, सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासक अधिकारी यांच्या उपस्थितीत इर्षा भगत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राजुरी गावचे उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या राज्यस्तरीय पुरस्काराने काम करण्याची ऊर्जा मिळाली असून, या पुरस्काराचे श्रेय सर्व राजुरी ग्रामस्थांना देत आहे. भविष्यात अशी अनेक कामे गाव पातळीवर व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच करणार असल्याचे विद्यमान सरपंच इर्षा भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले.