पुणे: जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद आता बाजारात स्पष्टपणे उमटत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे बाजारात अनिश्चिततेचे सावट असून, सोन्या-चांदीच्या किमतींनी मोठी घसरण नोंदवली आहे. अमेरिकेच्या आक्रमक लष्करी कारवाईनंतर जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता

या युद्धजन्य वातावरणाचा थेट फटका ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (MCX) वर बसला आहे. सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम २,९४३ रुपयांनी कमी होऊन ते १,४९,५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चांदीच्या दरात तर मोठी पडझड पाहायला मिळाली असून, प्रति किलो दरात तब्बल १०,००० रुपयांची घसरण होऊन आता ती २,५०,००० रुपयांवर आली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत १ टक्का वाढ झाली आहे.

सध्याच्या सराफा बाजारातील दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,८६० रुपये इतका आहे. दागिन्यांसाठीचे २२ कॅरेट सोने १,३६,४५० रुपयांवर, तर १८ कॅरेट सोने १,११,६४० रुपयांवर आहे.







