सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवे गॅजेट्स लाँच केले जात आहेत. स्मार्टफोन, स्मार्टवॉच सारखे गॅजेट्स अगदी सहज उपलब्ध झाली आहेत. त्यात आता iQOO या कंपनीने आपले नवीन स्मार्टवॉच iQOO लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच ई-सिमला सपोर्ट करते. यात 1.43 इंच डायलही देण्यात आली आहे.
iQOO चे हे स्मार्टवॉच ऑन डिस्प्ले मोडला सपोर्ट करते. यामध्ये यूजर्स अनेक प्रकारचे वॉचफेस वापरू शकतात. नेव्हिगेशनसाठी, त्यात फिरणारे क्राऊन बटण आणि एक बटण देण्यात आले आहे. स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रकारचे हेल्थ मॉनिटरिंग फीचर्सही आहेत. यात हार्ट रेट सेन्सर आहे जो 24 तास काम करतो, रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी एक SpO2 सेन्सर देखील आहे. हा स्लीप ट्रॅकर तणावाची पातळी मोजू शकतो.
यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. हे BlueOS वर चालते. यात ई-सिम, स्पीकर आणि मायक्रोफोन देखील आहे. क्यूआर कोड पेमेंट, एनएफसी कार की, कॅमेरा, म्युझिक कंट्रोल यांसारख्या अनेक फीचर्सचाही यात समावेश आहे. यात 505mAh बॅटरी आहे ज्यामुळे ती एका चार्जवर 7 दिवस टिकते. iQOO Company Launches Smartwatch Health monitoring includes many features