मुंबई : क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात धर्मवेडयांप्रमाणेच क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. आता क्रिकेटवरच प्रेमच कांदिवलीतील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.आयपीएल मॅच दरम्यान फोनवर जोरात बोलत असल्याच्या रागातून तरुणाला इमारतीतून खाली फेकलं आहे. इमारतीतून खाली पडून जितेंद्र चौहान याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या साईबाबानगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र चव्हाण असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अफसर जमीर आल, याला अटक केली आहे. मॅच दरम्यान फोनवर जोरात बोलण्यावरून दोघांमध्ये हमरीतुमरी झाली होती.या घटनेनंतर इमारतीमध्ये तणाव निर्माण झाला. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, व्हिडिओमध्ये परिसरातील इतर लोक मदतीसाठी ओरडताना आणि सुरक्षा हस्तक्षेपाची मागणी करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
दरम्यान गेल्या काही वर्षांत, आयपीएल सामन्यांमधील चाहत्यांना त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमुळे अनेकदा असे प्रकार समोर आले आहे