नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात बहुतांश जणांमध्ये Apple च्या iPhone ची चांगली क्रेझ आहे. असे असताना आता तुम्हाला Apple चा iPhone 15 स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हे दिवस चांगले आहेत. कारण, तुम्ही हा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकता.
iPhone 15 (ब्लॅक, 128 GB) ची यापूर्वी किंमत 69,900 रुपये होती. परंतु, कोणत्याही बँक सवलतीशिवाय ते फ्लिपकार्टवर 12% सवलतीवर उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 60,999 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, फोनवर संपूर्ण 9 हजार रुपये वाचतात. सवलती इथेच संपत नाहीत. या फोनवर चांगली एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात देखील मिळवू शकता.
तुम्ही तुमचा जुना Apple iPhone 14 एक्सचेंज केल्यास तुम्हाला 29,500 रुपयांची सूट मिळू शकते. अशाप्रकारे फोनची किंमत आणखी कमी होते आणि तुम्ही हा स्मार्टफोन 31,499 रुपयांना खरेदी करू शकता. एक्सचेंज केलेल्या फोनचे मूल्य त्याच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेता येणार आहे.