पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पाच निरीक्षकाच्या अंतर्गत बदल्या आलेल्या असून काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकपदी खंडणी विरोधी पथक २ चे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट ५ ची जबाबदारी सांभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोथरूड पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष शाखेतील संदीपान पवार यांना डेक्कन पोलीस स्टेशन देण्यात आले असून कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जागताप याची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे.
कोथरूड पोलीस स्टेशनला गुन्हे विभाग सांभाळणारे गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बढे यांना वाहतूक विभाग देण्यात आला आहे.