पुणे :आर्थिक वर्ष 2022-23 च्या उत्तरार्धात महागाई हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेला महागाईपासूनही दिलासा मिळू शकतो. असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शनिवारी सांगितले आहे. तसेच यामुळे अर्थव्यवस्थेत मोठी मंदी येण्याची शक्यताही कमी झाली आहे.
आरबीआय गव्हर्नर दास म्हणाले की, बाजार पुरवठा बाजूने चांगला दिसत आहे आणि अनेक उच्च वारंवारता निर्देशक 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) पुनर्प्राप्तीकडे निर्देश करत आहेत. आमचे सध्याचे मूल्यांकन असे आहे की 2022-23 च्या उत्तरार्धात महागाई हळूहळू कमी होऊ शकते.
दरम्यान, कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह दरम्यान आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या गोष्टी सांगितल्या. सध्याचे युग महागाईच्या जागतिकीकरणाचे असल्याचेही आरबीआय गव्हर्नर म्हणाले आहेत. याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु महागाई अजूनही मोठी समस्या आहे.