पुणे, : पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस शनिवारी (ता. ७) आणि रविवारी (ता. ०८) ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटी ते वाडी बंदर दरम्यान रिकाम्या रेल्वेची ने-आण करण्यासाठी तीन लाईन आहेत. चौथ्या लाईनचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – वाडी बंदर या सेक्शनवर मध्य रेल्वेकडून ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे २२ रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहेत. वाडी बंदर येथून रेल्वे गाडी गरजेनुसार सिक लाईन, पिट लाईन, एक्झामिनेशन लाईन आणि स्टॅबलिंग लाईन अशा वेगवेगळ्या मार्गावर पाठवली जाते.
सीएसएमटी ते वाडी बंदर दरम्यान रिकाम्या रेल्वेची ने-आण करण्यासाठी तीन लाईन आहेत. चौथ्या लाईनचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.
दरम्यान, या ब्लॉक मुळे २२ रेल्वे गाड्यांवर प्रभाव पडणार आहे. तर पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस (22106, 22105) शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात आली आहे. अन्य रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.