Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India’s Got Talent : सोनी एन्टरटेन्मेंटवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ला मिळाले आपले प्रतिभावान टॉप 6!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 2 November 2023, 15:01

India’s Got Talent : मुंबई : या जुलै महिन्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या इंडियाज गॉट टॅलेंटने देशभरातील अनोखी आणि अद्वितीय प्रतिभा यशस्वीरीत्या प्रेक्षकांपुढे आणली आहे. सदाबहार अर्जुन बिजलाणीने या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली, तर किरण खेर, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बादशाह या मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी परीक्षणाचे काम केले आहे. आता या अत्यंत लोकप्रिय टॅलेंट-आधारित रियालिटी शोमध्ये टॉप 6 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.

‘विजयी विश्व हुनर हमारा’हे आपल्या प्रतिभेतून सिद्ध करणारे हे टॉप 6 स्पर्धक आहेत – बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स- मुंबईचे झीरो डिग्री, छत्तीसगडचा एरियल मलखांब ग्रुप अबुझमाड मल्लखांब अकादमी, कोलकाताहून आलेला जबरदस्त डान्स ग्रूप गोल्डन गर्ल्स, ‘अॅक्रो डान्सर्स’ द आर्ट (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस), भारतीय शास्त्रीय फ्यूजन बॅंड रागा फ्यूजन (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) आणि नागालँडचा पॉवर पॅक्ड बॅंड महिला बॅंड.

 

छत्तीसगडमधील छोट्याशा गावातून आलेल्या अबुझमाड मल्लखांब अकादमीने हे सिद्ध करून दाखवले की, कठोर परिश्रम आणि दृढनिर्धार असल्यास काहीच अशक्य नसते. त्यांच्या मल्लखांबच्या करामती पाहून परीक्षकांनी त्यांची खूप वाहवा केली. इतकेच नाही, तर किरण खेर आणि बादशाह या दोघा परीक्षकांनी तर अकादमीला वित्तसहाय्य करण्याचे देखील वचन दिले. अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करताना या ग्रुपचा लीडर मनोज म्हणाला, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या टॉप 6 मध्ये येणे हे आमचे स्वप्न होते, जे साकार झाले आहे. हा कठोर परिश्रम आणि निष्ठेचा प्रवास होता, ज्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. आमचे गाव आमच्या नावाने ओळखले जाते. फिनालेमध्ये आमचा प्रयत्न 100% असेल!”

नागालँडच्या महिला बॅंडमधल्या मुलींनी‘आज की नारी, सबसे भारी’हे सिद्ध केले. दर आठवड्याला त्यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्सवर परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना देखील मंचावर जाऊन त्यांच्यासोबत ठेका धरायला लावायचा. या प्रवासाबद्दल बोलताना महिला बॅंडने सांगितले, “आम्ही सैन्यात काम करत असल्याने देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो. इंडियाज गॉट टॅलेंटच्या माध्यमातून आमच्यातील प्रतिभा देशासमोर सादर करण्याची संधी मिळाली. आम्ही ही ट्रॉफी जिंकू आणि आपल्या देशाची मान ताठ करू अशी आम्हाला आशा आहे.

सतत काही ना काही नावीन्यपूर्ण करणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणारे डान्स परफॉर्मन्स देणाऱ्या 40 सदस्यांच्या गोल्डन गर्ल्स या ग्रुपने अप्रतिम रचना करून सर्वांना थक्क केले. त्यांच्या परफॉर्मन्सेसने केवळ परीक्षकच नाही, तर आमंत्रित पाहुणे देखील अचंबित होत होते. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना गोल्डन गर्ल्स ग्रुपमधली सुमन म्हणते, “पहिल्या ऑडिशनपासून ते भव्य फिनालेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे आमच्यासाठी भावनांची एक रोलरकॉस्टर राईड होती. प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही जीव ओतून केला आणि आता फिनालेमध्ये आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत केवळ अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून नाही, तर प्रतिभा आणि चिकाटी यांच्या बळावर या प्रतिष्ठित मंचावर उलगडणाऱ्या अमर्याद शक्यतांचे प्रतीक म्हणून देखील! या अविस्मरणीय प्रवासात आम्हाला साथ आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!”

‘छोटा पॅक बडा धमाका’ही उक्ती सार्थ करणाऱ्या मुंबईच्या झीरो डिग्री या बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स ग्रुपने परीक्षकांसोबत देशातील लक्षावधी प्रेक्षकांचे हृदय देखील जिंकून घेतले. दर आठवड्याला परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना प्रभावित करत, छोटे वीर आता ग्रँड फिनालेमध्ये येऊन दाखल झाले आहेत. या प्रवासाविषयी बोलताना मोहम्मद मोहसीन म्हणतो, “फिनालेमध्ये जाणे झीरो डिग्रीचे स्वप्नवत आहे. या स्पर्धेत भाग घेणे हीच मुळात आमच्यासाठी आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट होती. इतर मुलांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी आमच्याकडून प्रेरणा मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही जिंकलो, तर आमचे आयुष्यच बदलून जाईल पण इथवर आल्यावर आम्हाला विजेते असल्यासारखेच वाटते आहे.या प्रवासात आम्ही जो आनंद अनुभवला आहे, तो आम्ही कधीच विसरणार नाही.”

तीन शरीरे पण एक मन असणाऱ्या द आर्ट ग्रुपने परीक्षकांना आणि खास करून शिल्पा शेट्टीला फारच प्रभावित केले. त्यांच्या जबरदस्त अॅक्रोबॅटिक मूव्ह्ज पाहून शिल्पा शेट्टीने कित्येकदा परीक्षकांच्या पॅनलवर उभे राहून त्यांचे कौतुक केले आहे. पण इतकेच नाही, तर या तीन कलाकारांनी दर आठवड्याला आपल्या अॅक्टमधून काही ना काही संदेश देखील दिला.आपला आनंद व्यक्त करत तेजस धुमानखेडे म्हणाला, “अजूनही हे एक स्वप्नच वाटते. ऑडिशन देण्याच्या 15 दिवस आधीपासून आम्ही तयारी सुरू केली होती. शिल्पा मॅमने आमच्या ग्रुपला नाव दिले. आमच्या या प्रवासात खूप चढ-उतार आले, पण आम्ही हार मानली नाही. इंडियाज गॉट टॅलेंटने आम्हाला नवी ओळख दिली. आम्हाला आशा आहे की आम्ही ही ट्रॉफी जिंकू आणि सर्वांना आमचा अभिमान वाटेल!”

रागा फ्यूजनने सुंदर फ्यूजन सादर करून फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. दर आठवड्यात हा ग्रूप शास्त्रीय स्पर्श देऊन, छोटी रोपे, बाटल्या यांचा वाद्यांसारखा उपयोग करून गाण्यांचे अप्रतिम फ्यूजन करत होता. या ग्रुपमधल्या अजयने त्यांच्या या प्रवासाबद्दल म्हटले की, “आम्हाला ही संधी देऊन आमच्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचे आभारी आहोत. आम्ही ग्रँड फिनालेमध्ये पोहोचून लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. खूप खूप आभार आणि आम्हाला आशा आहे की आम्ही सर्वांची मान अभिमानाने ताठ करू.” ही ट्रॉफी कोण पटकावणार हे जाणून घेण्यासाठी अवश्य बघा इंडियाज गॉट टॅलेंटचा ग्रँड फिनाले 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Maratha Reservation agitator suryakant kalbhors health deteriorated loni kalbhor pune

Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या सुर्यकांत काळभोर यांची प्रकृती खालावली; उपोषणस्थळीच उपचार सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.