गुवाहाटी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेत टिकून राहण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा करो या मरोचा सामना असेल. त्याचबरोबर भारतीय संघ विजयासह मालिकेवर कब्जा करेल. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाने 4 तर भारताने 1 खेळाडू बदलला आहे.
टीम इंडियाने मुकेश कुमारच्या जागी वेगवान गोलंदाज आवेश खानचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिड हेड, अॅरॉन हार्डी, केन रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या रूपाने एकूण चार बदल केले आहेत. विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध १३७ धावांची खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडवर सर्वांच्या नजरा असतील.
भारताची प्लेइंग इलेव्हन
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसीध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन
ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नॅथन एलिस, जेसन बेहरनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन.