भारतीय रेल्वे ही सर्वसामान्य नागरिकांची एकप्रकारे जीवनवाहिनीच आहे. ही रेल्वे सर्वात जुनी आहे. त्याचा इतिहासही मोठा आहे. त्यामुळे जगातील काही लांब रेल्वे स्टेशन्सपैकी सर्वाधिक रेल्वे स्टेशन्स ही भारतातच आहेत. जगात भारताचा लांब रेल्वे प्लॅटफॉर्मच्या यादीत चौथा क्रमांक लागतो.
भारतात 10 पैकी 7 प्लॅटफॉर्म हे सर्वात लांब आहेत. हुबळी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची लांबी 1507 मीटर आहे. मार्च 2023 पासून हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. तसेच उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे स्थानक हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी 1366 मीटर आहे. विशेष म्हणजे आधी हे गोरखपूर जंक्शन पहिल्या स्थानावर होते. मात्र, हुबळी इथे नवीन प्लॅटफॉर्म बांधल्याने गोरखपूर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
उत्तर प्रदेशातील पीलीभीत जंक्शन हे जगातील सर्वात प्लॅटफॉर्मच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी 900 मीटर आहे. तर कोल्लम जंक्शन जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानकाची लांबी 1180.5 मीटर आहे. तर पश्चिम बंगालचे खरगपूर रेल्वे स्टेशन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.