सुरेश घाडगे
परंडा : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त परंडा भुईकोट किल्ला, न्यायालय, तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती , पोलीस ठाणे आणि तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध बँक, शाळा ,महाविद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. तहसिल कार्यालयात तहसिलदार रेणुकादास देवणीकर , किल्ला येथे नायब तहसिलदार सुजित वाबळे ,नगर परिषदेत मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, परंडा पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान, १३ ते १५ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून नागरिकांनी घरावर झेंडा फडकवून स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
तसेच ज्ञानभाग्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जिल्ह्या पंचायतच्या. माजी सदस्य सिध्देश्र्वर पाटील , शिंदे महाविद्यालय , शिवाजी महाविद्यालय,संत मीरा स्कूल, ग्लोबल स्कूल, बावची विद्यालय ,खंडेश्वर स्कुल ,महात्मा गांधी विद्यालय ,कै.महारुद्रबप्पा मोटे हायस्कुल , जिजामाता विद्यामंदीर , सरस्वती , कल्याणसागर विद्यालय, विजयसिंह पाटील विद्यालय चिंचपूर, कमांडो करिअर अॅकॅडमी परंडा,
देऊळगांव जि.प. शाळा, पवित्राताई दैठणकर हायस्कूल रत्नापूर, श्रीराम हायस्कूल पाचपिंपळा, भौरवनाथ विद्यालय व पुष्पराज बालकाश्रम कंडारी, सिध्देश्र्वर विद्यालय देवगाव , रावसाहेब पाटील विद्यालय, जिल्हा पंचायत. शाळा परंडा,
संत ज्ञानेश्वर विद्यालय तांदुळवाडी, डोंजे विद्यालय डोंजे तसेच सर्व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी ध्वजारोहण विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.