राहुलकुमार अवचट
यवत – नवनविन उपक्रम राबविण्यात कायमच आग्रेसर असलेल्या ( ता. दौंड ) येथील मिरवडी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाने तालुक्यात सगळीकडून कौतुक होत आहे. ग्रामपंचायत मिरवडीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र उत्साहात व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मिरवडी येथे १५ आॕगस्ट रोजी होणारे ध्वजारोहण इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे तालुक्यात मिरवडी ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्थांनी याचा आदर्श घेऊन असे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होईल अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.