Tuesday, July 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाळ-मृदुंगाच्या निनादात इंदापूर दुमदुमले; संत तुकाराम महाराज पालखीचे दुसरे रिंगण उत्साहात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 July 2026, 18:11

आदित्य बोराटे

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण शनिवारी (दि. १८) इंदापूर येथील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडले. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि मानाच्या अश्वांच्या वायुवेगाने झालेल्या दौडीने संपूर्ण इंदापूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

पहाटे निमगाव केतकी येथे नित्यपूजा व आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ सकाळी ६ वाजता इंदापूरकडे प्रस्थान झाला. तरंगवाडी व गोकुळीचा ओढा येथे विसावा घेत पालखी सकाळी ११.३० च्या सुमारास रिंगणस्थळी दाखल झाली. नगारखाना आणि दिंड्यांच्या आगमनानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ तसेच ५० हून अधिक दिंड्यांनी रिंगणस्थळी प्रवेश केला. रथ मध्यभागी विराजमान झाल्यानंतर पताकाधारी, तुळसधारी महिला, विणेकरी, सेवेकरी तसेच पोलीस व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली.

 

रिंगण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण मानाच्या अश्वांची दौड ठरली. परभणी जिल्ह्यातील पाथर्डी (बाभळगाव) येथील माई दिंडीचा मानाचा अश्व आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या अश्वाने पालखीभोवती वायुवेगाने पाच प्रदक्षिणा घातल्या. अश्वांची दौड पूर्ण होताच मैदानात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. वारकऱ्यांनी अश्वांच्या पावलाखालची पवित्र माती कपाळी लावत भक्तिभाव व्यक्त केला.

रिंगणानंतर पालखीसमोर वारकरी, भाविक तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुगड्या खेळत भक्तीचा आनंद लुटला. जवळपास दोन तास चाललेल्या या सोहळ्यात प्रत्येक वारकरी विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पालखी रथ इंदापूर शहरात दाखल होताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष भरत शहा,भाजप नेते प्रदीप गारटकर,उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी पालखी रथाचे सारथ्य करत रिंगणस्थळी आणले.

यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, सोहळाप्रमुख विक्रम महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे तसेच विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकीता पाटील-ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो वारकरी या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार झाले.

संत तुकाराम महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषद आणि प्रशासनाने रिंगणासाठी उत्कृष्ट नियोजन केले. ध्वनीक्षेपकाद्वारे वारकऱ्यांना वेळोवेळी सूचना देत संपूर्ण सोहळा शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यात आला.

रिंगणानंतर पालखी रथ इंदापूर शहरातील आयटीआय परिसरातील पालखी तळावर मुक्कामी विसावला. इंदापूर, माढा, करमाळा तसेच पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले. इंदापूर येथील मुक्कामानंतर रविवारी (दि. १९) सकाळी पालखी सोहळा सराटी येथील पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

Monday, 20 July 2026, 22:59

औंधमधील हॉटेलमध्ये हप्तावसुलीसाठी तोडफोड; तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार

Monday, 20 July 2026, 22:29

NEET प्रकरण, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Monday, 20 July 2026, 22:26

पुण्यात ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Monday, 20 July 2026, 21:33

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

Monday, 20 July 2026, 20:54

मेटल डिटेक्टरने केला गेम! सुनावणीवरून कारागृहात परततांना आरोपीची अंगझडती घेतली अन् जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले..

Monday, 20 July 2026, 20:15
Next Post

करडेत मध्यरात्री थरार! रेकॉर्डवरील गुन्हेगारावर दोन राऊंड गोळीबार; तलावात उडी मारून वाचवला जीव, सहा जणांविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.