Tuesday, July 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 20:54

बारामती : बारामती शहरातील अरिहंत मिनी मार्केटमध्ये कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा संशयित साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे कृत्रिम दूधनिर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या संभाव्य रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई १६ जुलै रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागांत कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार बारामतीतील अरिहंत मिनी मार्केटमधील आस्थापनावर छापा टाकण्यात आला.

 

तपासणीदरम्यान २५ किलोचे व्हे पावडरचे एक पोते, स्किम मिल्क पावडरची दोन पोती आणि व्हे परमिट पावडरची दोन पोती असा संशयित साठा आढळून आला. संबंधित साहित्याच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे मागविल्यानंतर आस्थापनाचे मालक संदीप अशोकलाल बागमार यांना ती सादर करता आली नाहीत. चौकशीत हा माल विविध दूध विक्रेते, दूध संकलन केंद्रे आणि शीतकरण केंद्रांना पुरवण्यासाठी साठवून ठेवल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी संदीप अशोकलाल बागमार, नीलेश मोरे, भोरी मॅडम, दत्तात्रय बावधे, दीपक पिसाळ, प्रवीण दातीर, सूरज सोलनकर आणि हेमंत टेके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

Monday, 20 July 2026, 22:59

औंधमधील हॉटेलमध्ये हप्तावसुलीसाठी तोडफोड; तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार

Monday, 20 July 2026, 22:29

NEET प्रकरण, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Monday, 20 July 2026, 22:26

पुण्यात ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Monday, 20 July 2026, 21:33

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

Monday, 20 July 2026, 20:54

मेटल डिटेक्टरने केला गेम! सुनावणीवरून कारागृहात परततांना आरोपीची अंगझडती घेतली अन् जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले..

Monday, 20 July 2026, 20:15
Next Post

पुण्यात 'कॉक्रोज जनता पार्टी'च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.