Tuesday, July 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 July 2026, 22:59

पुणे : समन्वय पोर्टलवरील मनी ट्रेल विश्लेषणातून पुणे शहरातील सायबर फसवणुकीशी संबंधित आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. देशभरातील सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम स्वीकारून ती पुढे इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यासाठी स्वतःच्या नावावरील बँक खाती उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित खातेदारांविरुद्ध मुंढवा, फुरसुंगी, काळेपडळ, विमानतळ आणि खराडी पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासात मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येस बँकेच्या खात्यातून देशातील सात नागरिकांच्या ४३ लाख १ हजार रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित व्यवहार झाल्याचे समोर आले. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात ३४ लाख रुपये जमा करून ते पुढे इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ४६ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खात्यातून १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम फिरविण्यात आली होती. तर खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ बडोदाच्या खात्याद्वारे देशातील सात नागरिकांची ३ कोटी ६० लाख ५२ हजार रुपयांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले आहे.

 

राष्ट्रीय सायबर तक्रार प्रणालीवर नोंद झालेल्या प्रकरणांतील आर्थिक व्यवहारांची साखळी तपासताना ही संशयास्पद बँक खाती समोर आली. त्यानंतर खातेदारांची माहिती, संबंधित बँका आणि व्यवहारांची पडताळणी करून ही प्रकरणे पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वतःच्या खात्यात न घेता इतरांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करतात. अशा खात्यांना ‘म्युल खाते’ म्हटले जाते. या खात्यांमध्ये रक्कम जमा होताच ती काही मिनिटांतच इतर अनेक खात्यांमध्ये वर्ग केली जाते. त्यामुळे मूळ आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते. अशा खातेदारांवरही सायबर गुन्ह्यांना सहकार्य केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, पुण्यातील स्वारगेट परिसरात मालकाच्या ६ लाख ५० हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जयंत रजनीकांत शहा (५९), सोहेल अलीअहमद खान (३५) आणि तौसीफ मुकीद बागवान (३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी अनेक वर्षे विश्वासाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या जावयासह साथीदाराच्या मदतीने चोरीचा कट रचला. ९ जुलै रोजी गुलटेकडी येथील ‘हर्ष रेसिडेन्सीज’ सोसायटीबाहेर व्यावसायिकांचा वॉचमन रोकड असलेली बॅग घेऊन इमारतीत जात असताना आरोपींनी ती हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.

स्वारगेट पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. तिघांना अटक करून चोरीची संपूर्ण ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर गुन्हेगारांचे पुण्यात ‘नेटवर्क’ सक्रिय! कोट्यवधींच्या फसवणुकीची साखळी उघड

Monday, 20 July 2026, 22:59

औंधमधील हॉटेलमध्ये हप्तावसुलीसाठी तोडफोड; तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार

Monday, 20 July 2026, 22:29

NEET प्रकरण, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी इंदापूरमध्ये मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Monday, 20 July 2026, 22:26

पुण्यात ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Monday, 20 July 2026, 21:33

बारामतीत कृत्रिम दूधनिर्मितीच्या संशयित रॅकेटचा पर्दाफाश? आठ जणांवर गुन्हा

Monday, 20 July 2026, 20:54

मेटल डिटेक्टरने केला गेम! सुनावणीवरून कारागृहात परततांना आरोपीची अंगझडती घेतली अन् जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले..

Monday, 20 July 2026, 20:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.