Indapur News : इंदापूर : वालचंदनगर कंपनीतील कामगारांची थकीत देणी व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी कंपनीचे मालक चीराग शेठ दोशी यांच्याशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता. १५) लाक्षणिक उपोषण स्थळावरून सकारात्मक चर्चा केली.
कंपनी मालकाशी सकारात्मक चर्चा
वालचंदनगर कंपनीतील आय.एम.डी. कामगार समन्वय संघटनेने कामगारांची थकीत देणी मिळावीत, या व इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १५) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. (Indapur News ) या उपोषणास हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड, संजय नकाते, राहुल बावडेकर आदींनी कामगारांच्या मागण्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मांडल्या. (Indapur News ) याप्रसंगी कंपनीतील कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी मालक चीराग शेठ दोशी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य राहील, असे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूर तालुक्यातील शहा गावात एका रात्रीत तीन घरफोड्या ; २ लाखांचा ऐवज लंपास..