Indapur News इंदापूर : इंदापूर नगरपरिषद इंदापूर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रम व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (जिल्हास्तर) अंतर्गत इंदापूर शहरातील 13 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.18) होत आहे. हा कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. (Indapur News)
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. रामराजे कापरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहर परिसरात विविध विकासकामे मोठ्या संख्येने होत आहेत. या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इंदापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.