IND vs AUS : मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीने दमदार शतक ठोकलं आहे. त्याचं हे शतक पाहायला त्याचं संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होतं. ज्यावेळेस त्याने शतक ठोकलं त्यावेळेस त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. या संदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर आता नितीश रेड्डी यांच्या कुटुंबियांनी टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान नितीश कुमार रेड्डीचे कुटुंबिय भावूक झालेले दिसून आले आहे. या भेटीचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
नितीश कुमार रेड्डी यांचे वडील मुत्याला रेड्डी यांनी सुनील गावस्कर यांची त्यांच्या कुटुंबासह भेट घेतली आहे. गावस्कर यांची भेट घेतल्यानंतर रेड्डी यांचे वडील मुत्याला अतिशय भावूक झाले होते. यावेळी मृत्याला रेड्डी यांनी त्यांच्यासमोर हात जोडले. त्यानंतर त्यांचे पाय धरून नमस्कार करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये मुत्याला रेड्डी सुनील गावस्कर यांना प्रणाम करताना दिसत आहेत. त्यानंतर गावस्कर त्यांना पकडतात, उचलतात आणि मिठी मारताना दिसतात.
Nitish Kumar Reddy’s family meet the great Sunil Gavaskar @abcsport #AUSvIND pic.twitter.com/hUBOghxM2e
— Ben Cameron (@BenCameron23) December 29, 2024
दरम्यान तिसऱ्या कसोटीनंतर गावस्कर यांनी नितीश रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याची विनंती केली होती. नितीश रेड्डी हा आगामी काळात भारताचे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू सिद्ध होतील, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला होता. या मालिकेत रेड्डीने आतापर्यंत 4 सामन्यात 293 धावा केल्या आहेत ज्यात एका शतकाचा समावेश आहे. रेड्डी ऑस्ट्रेलियन भूमीवर एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
मेलबर्न गाऊंडवरील ऐतिहासिक खेळीनंतर, नितीशने सोशल मीडियावर आपल्या वडिलांचा अश्रू ढाळत एक भावनिक फोटो शेअर करत “हे तुमच्यासाठी आहे बाबा!” असे कॅप्शन लिहलं होतं. त्याचीही खूप चर्चा झाली.
भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. आज टीम इंडियाने नऊ विकेट्सवर 358 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 11 धावांची भर घालता आली. शेवटची विकेट म्हणून नितीश रेड्डी बाद झाला. तो 189 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 114 धावा करून बाद झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 228 धावांवर 9 गडी गमावले होते. तसेच आघाडी मिळून 333 धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताचा विजय आता काही शक्य नाही असंच काही क्रीडाप्रेमींना वाटू लागलं आहे. त्यामुळे भारतीय संघ पाचव्या दिवशी कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.