खडकवासला : पुणे परिसरात पावसाचा जार वाढला असून खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण ८५% टक्के क्षमतेने भरले असून पावसाचा जोर सुरूच राहिला तर परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये पुढील २४ ते ४८ तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगर पालिका व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, तसेच सर्व नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने आवाहन केले आहे.
नागरिकांना सांगण्यात आले आहे कि नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास त्यांना तात्काळ हलविण्यात यावे. सोबत सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.