पुणे: राज्यात चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीच्या कडाक्यात नागरिकांच्या हातपायांना ठणक उठली आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये चिकनगुनियाची रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत किती प्रमाणात रुग्णवाढ?
मध्यंतरी थंडीचे प्रमाण कमी झाले होते मात्र आता थंडीचा कडाका परत वाढला आहे. मुंबई सारख्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. महानगर पालिकेच्या क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यच्या आरोग्य विभागाने महापालिकेच्या ढिसाळ, निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले आहेत.