उरुळी कांचन, (पुणे) : संविधान दिनाचे औचित्य साधून नायगाव (ता. हवेली) येथे शनिवारी (त. २६) संविधान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संविधान चौक नामफलक व दिशादर्शकचे उदघाटन करण्यात आले.
संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले अधिकार व संविधानाची जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नायगावचे सरपंच जितेंद्र चौधरी, सोसायटीचे चेअरमन मनोज चोधरी, माजी उपसरपंच विकास चौधरी, उपसरपंच गणेश चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शेलार, सचिन हगवणे, धम्मदिप कांबळे, रविंद्र अवचट, श्रीकांत चौधरी, सचिन वंजारे, सागर राखपसरे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल शेलार यांनी केले होते.