सुरेश घाडगे
परंडा : परंडा शहरात लघुशंकेसाठी (मुतारी) आवश्यक सुविधा नसल्यामुळे नागरीकांची गैरसोय व कुचंबना होत आहे. त्यामुळे नगर परिषद व तहसिल कार्यालय यांनी लघुशंका मुतारी सुविधा तात्काळ उभारावी या मागणीचे निवेदन माहिती अधिकार संघटना परंडा तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने देण्यात आले आहे. हे निवेदन तहसिलदार रेणुकादास देवणीकर व मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांना बुधवारी (ता. २०) देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, परंडा शहरात ग्रामीण भागातुन बाजार आदी कामासाठी येणाऱ्या महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरीक यांच्या करीता शासकीय कार्यालयात विविध कामासाठी येत असतात. महिला-पुरुष लघुशंका करण्याकरीता परंडा शहरात कोणत्याही भागात कुठेही कसल्याही प्रकारचे मुतारी व्यवस्था नसल्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरीकांना या अडचणीस सामोरे जावे लागत आहे. नागरीकांची अडचण विचारात घेऊन हा विषय तात्काळ मार्गी लावुन शहरासह तालुक्यातील नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावीअन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या निवेदनावर राहुल बनसोडे, नवनाथ कसबे, लक्ष्मीकांत बनसोडे, नवनाथ साठे, अजितसिंह ठाकुर, कानिफनाथ सरपणे, फारूक शेख, विजय मेहेर, किशोर येवारे, अमीर सिकलकर, जमीर सिकलकर, संतोष शिंदे, मुस्तकीम शेख, असलम पल्ला,
जावेद शेख, मेजर समाधान लिमकर, राजुबाई दळवी, विमल शिंदे, आबासाहेब कोकाटे, गणिता गव्हाळे यांची स्वाक्षरी आहे.