Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मदनवाडीत शेतीच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, कोयता, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला! 7 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 October 2026, 13:34

भिगवण : शेतीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मदनवाडी (ता. इंदापूर) येथे घडली. जिमला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघालेल्या 18 वर्षीय आयटीआयच्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाड, कोयता, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात तरुणाचे समोरील दोन दात पडले असून, डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. डोक्यासह शरीराच्या विविध भागांवरही त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

लोक महेश देवकाते (वय 18, रा. देवकातेवस्ती, मदनवाडी, ता. इंदापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर साहील संताजी देवकाते, संताजी धनंजय देवकाते, संभाजी धनंजय देवकाते, चैतन्य सुतार, स्वप्नील हनुमंत देवकाते, तुषार हनुमंत देवकाते आणि सवाणे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करम्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक देवकाते यांचे वडील महेश आणि चुलते संताजी देवकाते यांच्यात शेतीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू असून, हा वाद इंदापूर येथील दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. याच कारणावरून कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे त्याने म्हटले आहे.13 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास लोक देवकाते हा घरातून इलेक्ट्रिक स्कुटीवरून भिगवण येथील डायमंड जिममध्ये जाण्यासाठी निघाला होता.

पहाटे साडेपाचच्या सुमारास बारामती-भिगवण रस्त्यावरील दगडी पुलाजवळ, देवकाते डी.पी. परिसरातील वळणावर त्याच्या मागून पल्सर मोटारसायकल आली. त्यावरील साहील देवकाते याने कुऱ्हाडीने लोक याच्या डोक्याच्या मागील बाजूस मारले. त्यानंतर संताजी देवकाते यांनी कोयत्याने त्याच्या डाव्या पायावर वार केल्याने तो खाली पडला. त्याचवेळी आणखी तीन मोटारसायकलींवरून काही जण घटनास्थळी आले आणि त्यांनी रस्ता अडवला.

 

लोखंडी रॉडने मारहाण; तलवारीचा वार चुकवला

फिर्यादीनुसार, संभाजी देवकाते याने लोखंडी रॉडने खांद्यावर व पाठीवर मारहाण केली, तर चैतन्य सुतार याने डाव्या हातावर रॉडने वार केल्याने हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. स्वप्नील देवकाते यानेही लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. तुषार देवकाते याने तलवार उगारून वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र आपण बाजूला सरकल्याने तलवारीचा वार चुकविल्याचे तरुणाने जबाबात म्हटले आहे. सवाणे नावाच्या व्यक्तीनेही लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या हल्ल्यात लोक याचे समोरील दोन दात पडले असून, त्याला अनेक दुखापती झाल्या. घटनेनंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जबाबात नमूद आहे. या प्रकरणी साहील संताजी देवकाते, संताजी धनंजय देवकाते, संभाजी धनंजय देवकाते, चैतन्य सुतार, स्वप्नील हनुमंत देवकाते, तुषार हनुमंत देवकाते आणि सवाणे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

चालकविरहित मोटारी नकोच!फडणवीसांची ठाम भूमिका; आधी तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp