लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीशी तब्बल चार वर्ष अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी सहा जणांवर पॉक्सोंतर्गत तर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश सुनिल खरात (वय २४), मंगेश सुनिल खरात (वय २०), सुनिल खरात (वय ५०), महेश खरात याची आई (वय-४५, नाव माहिती नाही), महेशची बहिण कोमल (वय ३० पूर्ण नाव माहित नाही) व (प्रशांत खरात, वय २४) यांच्यावर पॉक्सोंसह विविध गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दुसऱ्या घटनेत एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार ५ जणांवर हाणमार व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, सन २०२० मध्ये आरोपी सुनिल खरात याने पिडीत मुलीबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. पिडीत मुलीला फिरायला नेला. त्यानंतर आरोपीने महेश खरात पिडीतेशी अश्लिल वर्तन करून संभोग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा वारंवार पाठलाग करून शरिरसुखाची मागणी करीत होता. आरोपीच्या या वर्तनामुळे फिर्यादीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. त्यानंतर आरोपीने अश्लीश फोटो व व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रसारीत करण्याची धमकी देत होता.
दरम्यान, सदर फोटो व व्हिडीओ डिलीट कर असे सांगण्यासाठी फिर्यादी यांचे दोन भाऊ हे आरोपी सुनिल खरात यांच्या घरी सोमवारी (ता.२९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. तेव्हा वरील ६ आरोपींनी फिर्यादी यांच्या दोन्ही भावांना लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली व त्यांच्याविरुध्द अॅट्रॉसीटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची फिर्याद पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात मारहाण व पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार, सोमवारी (ता.२९) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ५ आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपीने त्याच्या बहिणेचे फोटो माझ्या मुलाच्या मोबाईलवर चेक केले. मात्र माझ्या मुलाच्या मोबाईलमध्ये मुलीचे फोटो नव्हते. आरोपींनी फिर्यादी यांचे पती व मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण केली. तसेच आरोपींनी पिडीतेला बलात्कार करण्याची धमकी दिली. तसेच सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार ५ जणांच्या विरोधात हाणमार व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व पॉक्सोंतर्गत ११ जणांवर परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी भेटी दिल्या आहे. ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे करीत आहेत. तर पॉक्सोंतर्गत गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.