अजित सायगावकर
फलटण : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीच्या माध्यमातून संयमी व अभ्यासू नेते यांनी मुद्देसूद भूमिका मांडली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती शिक्षक नेते सुभाष ढालपे यांनी दिली.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात, तात्यासाहेब,राज्याध्यक्ष, उदय शिंदे, बलवंत पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. संपुर्ण सातारा जिल्ह्यात सभासद परिवर्तन पॅनेलच्या एकवीस उमेदवारांना वाढता पाठींबा मिळत आहे.असे मत मार्गदर्शन शशिकांत सोनवलकर यांनी केले.
सभासद पॅनेलच्या भूमिकेचे स्वागत करून अपक्ष उमेदवार नितीन करे यांनी सभासद परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार राजेंद्र बोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला.
त्याच प्रमाणे शिक्षक समितीचे निलेश कर्वे यांनी फलटण गटाचे शशिकांत सोनवलकर यांच्या प्रचारात सहभागी होताना शिक्षक-शिक्षिका सभासदांना भेटून त्यांचे ही मत परिवर्तन घडवून आणण्यात मोलाचा वाट उचलत आहेत, असे समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी सांगितले.
यावेळी सतीश नलवडे, नारायण सपकाळ, भगवंत कदम ,द. बा. पवार, रघुनाथ कुंभार ,आण्णासाहेब शेवते, देविदास मोरे, डी. के. कदम, श .ज्ञा. कांबळे, दिलीप मुळीक, डुबल सर, गणेश तांबे, तानाजी ढमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. राजेंद्र बोराटे, उदय नाळे, नवनाथ धुमाळ, सोमनाथ लोखंडे यांनी प्रचारात महत्वाची भूमिका बजावत आहेत.