सुरेश घाडगे
परंडा : शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग प्रमाणे मावेजा देण्यात यावा. या प्रमुख ठराव मागणीसह विविध मागण्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे मार्ग संदर्भात भुमीअधिकरण परिषद व लाक्षणिक उपोषण आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांनी केले .
शेतकऱ्यांच्या मावेजा मागणीसाठी सोलापूर पासून ते अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शेतकरी रोहकल येथे ( दि. ८ ) रोहिरेश्वराच्या मंदिरात एक दिवस लाक्षणिक उपोषण व भुमीअधिकरण परिषदेत शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोजकुमार मुनोत होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी ,बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश गणगे, नॅशनल हायवे एग्रीकल्चर फार्मर्स फेडरेशन नाफीचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र जाधव,बार्शी तालुका अध्यक्ष सागर कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिषदेत ठराव व विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग प्रमाणे मावेजा देण्यात यावा,रोड मध्ये भूसंपादन करून राहिलेले वीस गुंठेपर्यंतचेही तुकडे शासनाने अधिग्रहीत करण्यात यावे व त्याचा मावेजा शेतकऱ्यांना द्यावा,शेती पाण्यासाठी पाईपलाईनची कायमस्वरूपी व्यवस्था चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या खालून करण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी, शेततळे अधिग्रहित केले आहेत त्या जमिनी संभाव्य होणाऱ्या जिरायत त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्यात यावी.
दरम्यान, अमेनिटी टर्मिनल आणि टोलमध्ये शेतकऱ्याला ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात यावे, दोन्ही बाजूंना २० – २० फुटाचे सर्विस रोड देण्यात यावेत, महामार्ग लगत दहा कि .मी. परिसर चा तीर्थक्षेत्राच्या धरतीवरती विकास व्हावा, द्राक्ष फळबागांना संपूर्ण शेती क्षेत्राचा नुकसान भरपाई मावेजा देण्यात यावा, ६ ऑक्टोबर २०२१ चा महाराष्ट्र शासनाचा जीआर रद्द करण्यात यावा, एससी,एनटी,एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना फेअर कॉम्पिशेशनुसार मावेजा देण्यात यावा, एनएचआय ने सर्व बांधकामे रेरा अॅक्टस , कायद्याच्या कक्षेत आणून रेरा रेगुलेशन अॅक्ट स्वीकारण्यात यावा . आदि ठराव व मागण्या या परिषदेत करण्यात आल्या.
यावेळी अॅड . प्रकाश गुंड, अनमोल वाघमारे, नाना पाटील कासारवाडीकर ,बाळासाहेब वाघ ,महादेव जाधव, किसन फरतडे, लक्ष्मण पिंपळे, बिभिषण गव्हाणे, सचिन गव्हाणे ,बापू कडे, बाबुराव कोलते, बाबुराव कोलते , बाळहरी जाधव, बाबा शेख, बाबासाहेब वाघ ,गणेश वाघ ,बापूसाहेब देशमाने ,गुरुदास जाधव , बापू सोनार,मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस आदि उपस्थित होते.