युनूस तांबोळी
शिरूर : टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विदयालात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा व गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सन १९८४ ते २०२२ पर्यंतच्या इ.१० वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. आतापर्यंत या विद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्यातील बरेचसे विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील व उत्तम व्यावसायीक आणि प्रगतशील शेतकरी बनलेले आहेत. तब्बल ४० वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वजण वर्गातील व शाळेच्या जुन्या आठवणी
यावेळी जवळपास १२० गुणवंत माजी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले. बबुशा उचाळे, रमेश गुगळे, गणेश खामकर, मच्छिंद्र भाकरे, महेश गावडे, बाळासाहेब घोडे, संगिता गांधी व मिरा प्रभूणे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे व प्राचार्य आर. बी. गावडे यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास १२० गुणवंत माजी विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री प्रभाकर खोमणे यांना जीवनगौरव पुरस्कार व प्राचार्य आर. बी. गावडे महर्षी पुरस्कार परिक्षा परिषद पुणेचे नि. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
विद्यालयाचे संस्थापक – अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक श्री.राजेंद्र गावडे, जि. प. माजी सदस्या सुनिताताई गावडे, मुख्याध्यापक विलास घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, चांडोह वि.का.सोसा. अध्यक्ष बाळासाहेब सालकर, टाकळी हाजी सोसायटीचे माजी अध्यक्ष चांदा गावडे, चंद्रकांत साबळे, माजी सरपंच दिपक दुडे, पैलवान प्रशांत चोरे, शिवाजी महाराज कांदळकर, शिवाजी महाराज गावडे, धोंडीभाऊ जाधव, डॉ.प्रकाश उचाळे, पोपट हिलाळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे संभाजी साबळे, दत्तात्रय मुसळे, विजय थोरात, बाबाजी रासकर, धोंडीभाऊ गावडे, दत्तात्रय शिंदे, स्वप्निल गावडे, भरत घोडे, योगेश भाकरे, नितीन गावडे, अनिल पखाले, किरण भाईक, प्रतिक साबळे, शशिकला चोरे, कल्पना हिलाळ, अर्चना सोदक यांनी विशेष प्रयत्न केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी तर सुत्रसंचालनलहू साबळे यांनी केले. शशिकला चोरे हिने आभार मानले.