मुंबई : १ ऑक्टोबरपासून अनेक वित्तीय नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम हा नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आधार कार्डपासून ते अनेक छोट्या-मोठ्या योजनांचा समावेश आहे. नियमांत झालेले बदल नेमके कोणते? याची माहिती जाणून घेऊ.
१) ATF आणि CNG-PNG किंमतीत बदल
महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक तेल कंपनी ATF आणि CNG-PNG किंमतीत सुद्धा बदल करत असते. सप्टेंबर महिन्यात हा भाव कमी झाला होता. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात भाव वाढणार की कमी होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे.
२) LPG सिलिंडरच्या किंमती
ऑईल मार्केटींग कंपन्यां महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. त्यामुळे १ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजताच नवे दर जाहिर केले जाऊ शकतात. यंदा दिवाळी आधी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता असण्याचा अंदाजा आहे.
३) आधार कार्ड
१ ऑक्टोबर २०२४ पासून तुम्ही आधार एनरॉलमेंट आयडीचा वापर परमनंट पॅन कार्ड आणि आयआरटी दाखल करू शकत नाही.
४) छोट्या योजनांसाठी नवे नियम
वित्त मंत्रालयाने नॅश्नल स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये चुकीच्या पद्धतीने खाती खोललेल्या व्यक्तींसाठी नवी निर्देश जाहीर केले आहेत. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी सारखी खाती दुरुस्त केली जाणार आहेत.
५) बोनस आणि शेअर्सच्या नियमांत बदल
सेबीने बोनस आणि शेअर्सचे ट्रेडिंगसाठी आणखी सोप्पे व्हावे म्हणून नवीन सारणी तयार केली आहे. १ ऑक्टबरपासून ट्रेडिंग T+2 प्रणालीमध्ये होणार आहे. तसेच ट्रेडिंगचा वेळ सुद्धा कमी होणार असल्याने शेअर होल्डर्संना याचा फायदा होणार आहे.
६) सिक्योरीटी ट्रांजेक्शन टॅक्स (STT)
१ ऑक्टोबर २०२४ पासून, विक्रीवरील STT 0.0625% बदलून 0.1% पर्यंत वाढणार आहे.
७) विवाद ते विश्वास योजना
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने अशी घोषणा केली आहे की विवाद ते विश्वास योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार आहे. यामध्ये आयकर विभागाशी संबंधित विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत.
८)भारतीय रेल्वे
जे प्रवासी रेल्वेने विना तिकीट प्रवास करतात त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून सणासुदीचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे या काळात अनेक प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचे नुकसान टाळण्यासाठी हा नियम १ तारखेपासूनच सरू होण्याची शक्यता आहे.
९) HDFC क्रेडिट कार्ड
लॉयलटीमध्ये बदल HDFC क्रेडिट कार्ड लॉयलटीमध्ये १ ऑक्टोबर २०२४ पासून बदल होणार आहे.