आपला आहारच बऱ्याच गोष्टी चांगल्या करतो. दिवसाची सुरुवात चांगल्या आहाराने करावी. त्यानंतर दुपारचे जेवण प्रमाणित आणि रात्रीचे जेवण कमी प्रमाणात करावे. आपण जे खातो आणि जेव्हा खातो ते आपल्या पचनसंस्थेवर, वजनावर आणि झोपेवर वेगवेगळे परिणाम करतात. त्यामुळे आहार चांगला असेल याची खात्री करून घ्या.
जगभरातील 62 टक्के प्रौढांना पाहिजे तशी झोप येत नाही. हेवी डिनर हे देखील यामागे एक मोठे कारण आहे. चांगल्या झोपेसाठी रात्रीच्या जेवणात काही पदार्थ टाळण्याचाही सल्ला दिला जातो. त्यात जेवण आणि झोप, दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. अन्न शरीराला ऊर्जा देते, तर झोप शरीराला विश्रांती देते. आपण कधी आणि काय खातो याचाही आपल्या झोपेवर परिणाम होतो. हाय फायबर, फॅटयुक्त आहारामुळे अधिक गाढ आणि शांत झोप लागते. तर रात्री हेवी आहार घेतल्यास ते पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा लागते. याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.
रात्रीच्या जेवणात फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे शरीरात फॅट जमा होते आणि लठ्ठपणा येऊ शकतो. तळलेले पदार्थ शरीरात ऍसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण करू शकतात. यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता येऊ शकते, ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. रात्रीच्या जेवणात गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे अन्न पचण्यास बराच वेळ लागतो.
त्याचप्रमाणे मसालेदार, प्रक्रिया केलेले पदार्थ, कॅफिन किंवा अल्कोहोल हे देखील झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात. रात्रीच्या जेवणात कोणत्या गोष्टी खाऊ नयेत. रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असावे, जेणेकरून ते सहज पचता येईल. त्यामुळे चांगली झोप लागते. यासाठी फायबर असलेल्या गोष्टी खाव्यात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.