माणसाला निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, प्रोटीन यांसारख्या घटकांची गरज असते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे तसे कठीण असले तरी काही लक्षणे ही संकेत देऊन जातात. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
जर तुम्हाला अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही उन्हात बसू शकता किंवा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेऊ शकता. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे हाडांसाठी अत्यंत आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे ऑस्टिओमॅलेशिया होऊ शकतो. त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. व्हिटॅमिन डी स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे किंवा स्नायू कमकुवत होऊ शकतात. कमकुवत स्नायू देखील पाठदुखीचे कारण असू शकतात.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा परिणाम वजनावरही होतो. सामान्य वजन असलेल्या लोकांपेक्षा जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता 35 टक्के कमी असते. याचे कारण फॅट पेशींमध्ये व्हिटॅमिन डीचे संचय असू शकते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर त्याचे एक कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते ते अनेकदा आजारी पडतात, अशी माहितीही समोर आली आहे.