नवी मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंत संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणावरून सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हत्येनंतर तब्बल 24 दिवसानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, दुसरीकडे याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड अटकेत आहे. कराड याचे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीमध्येही धनंजय मुंडे यांच्याबाबत मतांतरे असल्याचे दिसून येऊ लागले आहेत.
नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ यांनी शनिवारी हजेरी लावली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांच्यामुळं पक्ष अडचणीत येणार असेल तर ते अजित पवार पाहतील, मला कुणाच्याही राजीनाम्याची घाई करायची गरज वाटत नाही, असे परखड मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ आधीच नाराज आहेत. त्यानंतर आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही वक्तव्य केले आहे.
कुणाचे मंत्रिपद जाऊन मला मिळावे…
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कुणाचे मंत्रिपद जाऊन मला मिळावे अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. धनंजय मुंडे यांची चौकशी होईल आणि जे काय करायचे ते करतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. त्याबाबत ते निर्णय घेतील. पण, मला कुणाच्या राजीनाम्याची घाई करायची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार आणि ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे….
छगन भुजबळ यांनी म्हटले की, पवार आणि कुटुंबाने एकत्र यावे. त्याशिवाय ठाकरे कुटुंबाने देखील एकत्र यावे यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मला कुणाचाही फोन आला नाही. कुणीतरी फोन करणार ही मीडिया मधील चर्चा असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चाही फेटाळून लावली. मी भाजपमध्ये जाणार? मी नाराज आहे, हे सगळं सोडून द्या असेही छगन भुजबळांनी सांगितले.