पुणे : तुमच्याकडे असलेला आयफोन बनावट आहे, अशी जर तुम्हाला वाटले तर ते कसे ओळखाल, याबाबत माहिती जाणून घ्या. आपण अनेकवेळा खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतो. कधी कधी मूळ फोनच्या किमतीत बनावट आयफोन खरेदी करतात. यामुळे तुम्ही फोन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. बाजारात अनेक बनावट स्मार्टफोनही विकले जात आहेत. त्यापासून सावध राहणे गरजेच आहे.
फोन खरेदी करताना अशी घ्या काळजी
१)पहिल्यांदा तुम्ही बॉक्स उघडण्यापूर्वी मोबाईलचा आयएमईआय नंबर तपासा. यासाठी तुम्हाला अॅपलच्या अधिकृत वेबसाइट https://checkcoverage.apple. com/in/en वर जावे लागेल. येथे आयएमईआय क्रमांक टाकल्यानंतर तुमचे डिव्हाइस खरे आहे की नाही याची माहिती लगेच मिळेल.
२) तुमचा डिव्हाइस जर जुना असेल तर आयएमईआय नंबरऐवजी तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करू शकता. यासाठी, iPhone X किंवा नवीन मॉडेल्सचे डिस्प्ले बेझल तपासणे सर्वात सोपे आहे. फक्त खऱ्या फोनमध्ये तळाशी एकसमान बेझल उपलब्ध आहे.
३) बनावट उपकरणामध्ये जाड बेझल असतात. अॅप्पल पेंटलोब स्क्रू लाइटिंग पोर्टजवळ वापरते. स्क्रूच्या डोक्यावर पाच खोबणी असतील. यापेक्षा कमी म्हणजे डिव्हाइस बनावट आहे. याशिवाय तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अबाउटमध्ये जाऊन तुमच्या फोनचे व्हर्जन चेक करावे लागेल.
४) जर डिव्हाइस अँड्रॉईड आवृत्ती सांगत नसेल, तर तो बनावट आयफोन आहे. जेव्हा तुम्ही फोनसाठी साइन इन करता, तेव्हा तुम्हाला गुगल किंवा इतर खाते विचारले जात असेल, तर तो आयफोन बनावट आहे.