पुणे : मुंबईतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करावा लागणार आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’, मुंबई येथे रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 31,000 ते 35,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
यासाठी 10 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी [email protected] आणि [email protected] या आयडीवर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.