लोणी काळभोर, (पुणे) : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी (ता. ०७) फुरसुंगी (ता. हवेली) येथील नागरिकांनी राष्ट्रीय मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ यात्रा काढण्यात आली. यावेळी फुरसुंगीसह परिसरातील शेकडो नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘आजादी का अमृत महोत्सव’ ‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी देशप्रेमी, लहान थोर ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पुणे मनपा हडपसर क्षेत्रीय कार्यालयचे अधिकारी व कर्मचारी, पोस्ट ऑफिस अधिकारी व कर्मचारी, शिवमुद्रा मार्शल आर्टचे पथक आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झाले होते. व भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा या घोषणा देण्यात आल्या.
‘हर घर तिरंगा’ जनजागृती यात्रेची सुरुवात ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदीर येथून झाली. जय भवानी चौक, पवार आळी, सरोदे नगर, भोई आळी, वडकी रोड खंडोबामाळ, हरपळे आळी, वाजे घर, कामठे आळी, बाजार भैरवनाथ मंदिर करीत भैरोबा चौक येथे यात्रेचा समारोप झाला.
यावेळी भाजपा मध्ये हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे, शिवमुद्रा मार्शल आर्टचे प्रमुख तुषार पवार, पुणे महानगरपालिकेचे पोळ साहेब, फुरसुंगी पोस्ट ऑफिसचे जाधव, युवा नेते सोमनाथ पवार, ज्येष्ठ नेते बाळकृष्णकामठे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप हरपळे, मध्य हवेली युवा मोर्चा सरचिटणीस संदीप परदेशी, ग्रामोपाध्याय यज्ञेश राहणे, फुरसुंगी गाव सरचिटणीस आकाश पवार, फुरसुंगी गाव युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय कामठे, युवा नेते कैलास सरोदे, विनायक चंद, सागर खुटवड, अविनाश मोडक, नंदकिशोर नारखेडे पाटील, किरण जाधव, सूर्यकांत सावंत, विशाल झिरमिले, विजय परदेशी, शिवराज फड, संतोष परदेशी, अभय शिंदे, संदीप महाजन, राज कामठे, राहुल पानसरे, महेश पोकळे, जनार्दन लांडगे आदी उपस्थित होते.