नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात Huawei ने भारतात आपला नवीन स्मार्टवॉच Watch GT 5 Pro लाँच केला आहे. हा वॉच 29,999 रुपयांपासून सुरू होत आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला अनेक हेल्थ मॉनिटरिंग आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स मिळतील आणि त्याची डिझाईनही खूप आकर्षक अशी करण्यात आली आहे.
Huawei चा हा स्मार्टवॉच iOS आणि Android दोन्हीवर काम करतो. Huawei ने साहस प्रेमींसाठी खास 46mm टायटॅनियम ब्लॅक व्हेरिएंट देखील लाँच केला आहे. भारतात, Huawei Watch GT 5 Pro Black ची किंमत 29,999 रुपये आहे, तर Huawei Watch GT 5 Pro Titanium ची किंमत 39,999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच तुम्ही Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता.
Huawei Watch GT 5 Pro मध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. GT 5 Pro मध्ये अनेक हेल्थ मॉनिटर फीचर्स देण्यात आले आहेत. जी Huawei च्या TruSense तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, हार्टबिट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन निरीक्षण आणि तपशीलवार झोपेचे विश्लेषण समाविष्ट आहे. Huawei Watch GT 5 Pro ला IP69K रेटिंग आहे.
Huawei चे हे वॉच एरोस्पेस-ग्रेड टायटॅनियम अलॉय बेझेल, नॅनोक्रिस्टल सिरॅमिक बॉडी आणि सॅफायर ग्लास स्क्रीनसह डिझाइन केले आहे, ज्यामुळे ते बळकट तसेच छान दिसते. घड्याळामध्ये संरक्षणात्मक कोटिंग्ज आणि वॉटरप्रूफ डिझाइन देखील आहे.