पुणे प्राईम न्यूज डेस्क: अर्सलान गोनीला डेट करत असलेल्या सुझेन खानने एक रोमॅटिक पोस्ट शेअर केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर तिचा माजी पती हृतिक रोशननेही कमेट केली असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘जिया और जिया’ आणि ‘मैं हिरो बोल रहा हूँ’ या वेब सीरिजमधून आपला ठसा उमटवणारा अर्सलान गोनी अनेक वर्षांपासून हृतिक रोशनची माजी पत्नी सुझेन खानला डेट करत आहे. दोघांनी २०२१ मध्ये त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता.
त्यानंतर दोघेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये, व्हेकेशनमध्ये किवा फंक्शनमध्ये एकत्र दिसतात. सुझेनने या पोस्टमध्ये तिचे आणि अर्सलानचे अनेक सुंदर आणि फोटो भाष्य शेअर केले आहेत. यासोबत कॅप्शनमध्ये तिने अर्सलानला तिचे ‘लाइफ’ असे वर्णन केले आणि लिहिले की, तिला त्याच्याशिवाय आयुष्यात दुसरे काहीही नको आहे. पोस्ट शेअर करताना सुझानने लिहिले की, मला आयुष्यात फक्त तुझी साथ हवी आहे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रेमा. तू मला दररोज या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवले आहेस.