लहू चव्हाण
पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावेत, उच्च पदावर काम करावे याच उद्देशाने स्व. बाळासाहेब भिलारे दादा यांनी संस्था स्थापन केली. दादांचे स्वप्न ऋषिकेश बरोबर या शाळेतील विद्यार्थी पूर्ण करीत आहेत याचा सर्वाना अभिमान आहे. असे गौरवोद्गार हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले आहेत.
आखेगणी (ता.जावली) येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश विलास गावडेची इंडियन नेव्ही एस एस आर लोजस्टिक रायटर पदी याची निवड झाली. या यशाबद्दल भिलार येथे हिलरेंज एज्युकेशन सोसायटी च्या वतीने
सत्कार करण्यात आला. त्यावेळी भिलारे बोलत होते.
यावेळी भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, हिलरेंज एज्युकेशन् सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे, आनंदा भिलारे, गणपत पार्टे, हिलरेंज हायस्कुलचे प्राचार्य जतिन भिलारे,प्रवीण भिलारे, अमोल भिलारे, हिलरेंज माध्यमिकचे मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, कै. एम आर भिलारे हायस्कुल च्या मुख्याध्यापिका तेजस्विनी भिलारे , संजय भिलारे आदी उपस्थित होते.
ऋषिकेश गावडे याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा आखेगणी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलार, येथे झाले.पहिल्या पासूनच उच्य शिक्षण घेऊन आर्मी किंवा इंडियन नेव्ही यासारख्या मध्ये काम करण्याची मना मध्ये जिद्द होती.त्यासाठी त्याने अतोनात प्रयत्न श्रम करून तो आज देश सेवेत रुजू झाला.
दरम्यान, ऋषिकेश गावडे घरची परस्थिती तशी हालाखीचीच आई वडील शेती व्यवसाय करून आपली गुजराण करीत त्याला उच्च शिक्षित केले व त्यांचे कष्टाला आज फळ मिळाले. मुलगा हा चांगल्या हुद्यावर काम करणार म्हणून ते आनंदित तर झालेच पण ग्रामस्थांनी त्याची गावात मिरवणूक काढून आपला आनंद व्यक्त केला.
आखेगणी गाव तसे दूर्गमच पण या गावातील मुले हे शेती मध्ये कष्ट करत आपले उच्च शिक्षण घेत आहेत. या गावात एवढ्या मोठ्या हुद्यावर जाणारा गावातील सहावी व्यक्ती असून आणि अजून काही मुलेही स्पर्धा परीक्षा देत आहे. आगामी काळात या गावतील विद्यार्थी हे देशाच्या नकाशावर चमकतील यात शंका नाही.