पुणे : पंचांगानुसार तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
नोकरी धंद्यामध्ये शुद्ध वैचारिक भूमिका ठेवल्यामुळे दूरगामी फायदे होतील.
वृषभ
समस्या येतील पण समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा.
मिथुन
कलाकार लोकांना कलेच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील.
कर्क
आज काही स्फूर्तीदायक घटना घडतील महिला जरा जास्तच रसिक बनतील.
सिंह
आज खूप काम करावेसे वाटेल. स्त्रियांना जोडीदाराची जमवून घ्यावे लागेल.
कन्या
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिकारशी झगडा करण्यात धन्यता मानाल.
तूळ
उद्योग व्यवसायात कष्टाचे डोंगर उपसावे लागले तरी सर्व करण्याची तयारी दर्शवाल.
वृश्चिक
प्रयत्नांनी यश प्राप्ती नक्की होईल मानापमान जरा जास्त टोकदार होतील.
धनु
स्वतःबद्दल नसत्या कल्पना करून घेऊ नका कधीतरी अना ठायी उत्साह दाखवाल.
मकर
घरामध्ये आवश्यक नाही अशा गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
कुंभ
अहंकार आणि हटवादी वृत्ती सोडून परिस्थितीशी दोन हात करायला सिद्ध व्हाल.
मीन
मानसिक अस्वस्थता वाढेल आर्थिक निर्माण झालेले प्रश्न जरा जास्तच चिघळतील.