राशीभविष्य, गुरूवार १५ जून २०२३
How Is Your Day :
मेष:-करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
तूळ:-दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
वृषभ:-घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.
मिथुन:-आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात.(How Is Your Day) क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
कर्क:-व्यापार्यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा.
सिंह:-दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
कन्या:-मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.
वृश्चिक:-क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.
धनू:-कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. (How Is Your Day) आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवतांना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा.
मकर:-अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल.
कुंभ:-नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा.
मीन:-कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. (How Is Your Day) सहकार्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता. कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल. छंद जोपासायला वेळ काढा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन
Pune News : अपंगत्व आले जरी, सुटली नाही विठ्ठल भक्ती…; अपंगात्वर मात करत भक्त निघाला पंढरपूरी!