भात ही अशी गोष्ट आहे, जी कोणाला आवडत नाही असा जगात माणूस नाही. भारतीय खाद्य पदार्थाचा भात हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात भाताप्रमाणे चपाती, भाकरी, रोटीला महत्त्व दिले जाते. ताजा भात म्हणजेच, गरम भात खाणं जास्त फायदेशीर आहे, असे अनेकांचे मत आहे. काही लोकांचा असा समज आहे की, थंड भात आरोग्यासाठी चांगला असतो. त्याशिवाय अनेकांना असा प्रश्न पडतो की, भात दुपारी खाण फायदेशीर की रात्री खाण फायदेशीर? चला तर जाणून घेऊयात याविषयी सर्व काही.
तज्ज्ञांच्या मते, ताज्या भातापेक्षा थंड भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण थंड भातामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. हे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे. थंड भात खाल्ल्याने आतड्यातील बॅक्टेरिया अन्न पचण्यास मदत करतात. याशिवाय थंड भात खाल्ल्यानं शरीरातील कमी कॅलरी शोषून घेतात.
भात कधी खावा
तज्ज्ञांच्या मते, भात दिवसा खावा, रात्री जेवताना नाही. कारण, भात खाल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. जर दिवसा भात खाल्ला तर , त्याचे पचन व्यवस्थित होते. त्याशिवाय, दिवसा शरिराची जास्त हालचाल असते. त्यामुळे भात हा दिवसा खाणे फायदेशीर असतो.
पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर
भातामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे पचनासाठी चांगलं मानलं जातं. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. जे अन्न पचण्यास मदत करतात. भातामध्ये स्टार्च असल्यानं पचनाचा त्रास होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
भात खाण्याची योग्य पद्धत
भात गरम खाण्याऐवजी, जेव्हाही खाल तेव्हा थंड करुन खा. जेव्हा भात काहीसा थंड होईल, तेव्हा 5 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. अशा पद्धतीनं भाताचं सेवन केल्यानं त्यातील पोषक तत्व वाढतात.
ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी
भातात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतं. जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतं. त्याचबरोबर तांदूळ पचायलाही हलका असतो.