पुणे : गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचं समोर आलं आहे . मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये उकाडा आणखी वाढला आणि काही ठिकाणी उष्णतेची लाटच पसरली. या आठवड्यात काही ठिकाणी नागरिकांना उन्हाचे चटके बसले आहेत. तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुणे, विदर्भासह काही जिल्ह्यात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान व विभागाकडून वर्तवला आहे.
दरम्यान सकाळी थंडीचीं हुडहुडी आणि दिवसभर उखाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आज कोरडं हवामान असणार आहे. याचसोबत धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये कोरडं हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्या ठिकाणी अति उष्णता असेल, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.